कराची - विश्वकरंडक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. यामुळे पाक संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. आता आर्थर यांच्या ठिकाणी पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.'
आज पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून मिसबाह-उल-हकची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या निवड समिती अध्यक्षपदीही मिसबाह-उल-हकची निवड पाक बोर्डाने केली. तर माजी गोलंदाज वकार युनिस यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.
बायकोला जास्त वेळ दिल्याने टीम इंडियातील खेळाडू संकटात!
दरम्यान, पाकिस्तान बोर्डाने मिसबाह-उल-हकला तीन वर्षांच्या कालावधीसाठी करारबद्ध केले आहे. मिसबाहने पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. तसेच पाकिस्तान संघाकडून ७५ कसोटी, १६२ एकदिवसीय आणि ३९ टी-२० सामने खेळले आहेत. तर गोलंदाजीचे प्रशिक्षक वकार युनिस यांनी ८७ कसोटी आणि २६२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात कसोटीमध्ये ३७३ आणि एकदिवसीय सामन्यात ४१६ गडी बाद केले आहेत.