कराची - यंदा झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाने केलेल्या खराब कामगिरीचे समीक्षण होण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड डच्चू देणार असून सोबत नवा कोचिंग स्टाफही नेमला जाणार आहे.
-
6 May 2016 ➩ 7 August 2019
— ICC (@ICC) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Mickey Arthur's stint as the Pakistan head coach has come to an end.https://t.co/Pnz5wK5w2c
">6 May 2016 ➩ 7 August 2019
— ICC (@ICC) August 7, 2019
Mickey Arthur's stint as the Pakistan head coach has come to an end.https://t.co/Pnz5wK5w2c6 May 2016 ➩ 7 August 2019
— ICC (@ICC) August 7, 2019
Mickey Arthur's stint as the Pakistan head coach has come to an end.https://t.co/Pnz5wK5w2c
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा करार वाढवण्यास नकार दिला आहे. बोर्डाने आर्थर यांच्या बरोबर सहसदस्य आणि कोचिंग स्टाफ, गोलंदाजीचे प्रशिक्षक अजहर महमूद, फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर, आणि ट्रेनर ग्रँट लूडेन यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीसीबीचे चेअरमन एहसान मनी यांनी याबात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'आपल्या कार्यकाळात संघाबरोबर मेहनत करणाऱ्या मिकी आर्थर, ग्रँट फ्लॉवर, ग्रँट लूडेन, आणि अजहर महमूद यांना मी धन्यवाद देतो. भविष्यात त्यांना यश मिळू दे अशी आम्ही प्रार्थना व्यक्त करतो.' २०१६ मध्ये मिकी आर्थर यांना पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले गेले होते. त्यांनी तिसऱयांदा आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.
आर्थर यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तान संघाने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठले. त्याबरोबरच, २०१७ मध्ये भारताला हरवत चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावर केली होती.