ETV Bharat / sports

''आगामी आयपीएल लिलावात बरेच संघ मॅक्सवेलला विकत घेण्याचा प्रयत्न करतील'' - glenn maxwell in IPL 2021

मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ४५, नाबाद ६३ आणि ५९ धावा केल्या. मॅक्सवेलने तीन सामन्यांच्या मालिकेत १९५च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा केल्या.

michael vaughan on glenn maxwell who will be high on demand in IPL 2021
''आगामी आयपीएल लिलावात बरेच संघ मॅक्सवेलला विकत घेण्याचा प्रयत्न करतील''
author img

By

Published : Dec 5, 2020, 12:11 PM IST

नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे कौतुक केले आहे. सध्या मॅक्सवेल ज्या फॉर्ममध्ये आहे त्याआधारे कोणताही संघ त्याला संघात समाविष्ट करण्यासाठी उत्सुक असेल, असे वॉन म्हणाला.

michael vaughan on glenn maxwell who will be high on demand in IPL 2021
मायकेल वॉन

हेही वाचा - फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना

मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ४५, नाबाद ६३ आणि ५९ धावा केल्या. मॅक्सवेलने तीन सामन्यांच्या मालिकेत १९५च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा केल्या. वॉन म्हणाला, ''जगात असा कोणताही मर्यादित षटकांचा संघ नसेल जो मॅक्सवेलला त्यांच्या संघात घेण्यास नाकारेल, असे मला वाटते. मला खात्री आहे की, आयपीएलच्या पुढील लिलावात अनेक संघ मॅक्सवेलला खरेदी करण्याचा प्रयत्न करतील.''

तो म्हणाला, "ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलला सातव्या क्रमांकावर स्थान दिले, जे त्याच्यासाठी योग्य आहे. संघ त्याला त्याच्या जागेवरुन हटवेल, असे मला वाटत नाही. माझा विश्वास आहे की, ऑस्ट्रेलियाने शेवटच्या १५ षटकांत मॅक्सवेलची भूमिका निश्चित केली आहे. कदाचित यावेळी मॅक्सवेल त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे संघाला वाटते."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.