लंडन - ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मायकल क्लींजरने टी-२० ब्लास्ट स्पर्धेत एक मोठा विक्रम रचला आहे. टी-२० क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले आहे.
३९ वर्षीय क्लींजरने ग्लूसेस्टरशायर कडून खेळताना ६५ चेंडूत १०२ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे क्लींजरच्या खात्यात आता टी-२० क्रिकेटमध्ये आठ शतके जमा झाली आहेत. २१ वर्षांची क्रिकेट कारकीर्द असणारा मायकल क्लींजर आता या स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे.
हेही वाचा - रोनाल्डो म्हणतो, 'मला मेस्सीसोबत जेवण करायला आवडेल'
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. क्लींजरनंतर एरॉन फिंच, डेविड वॉर्नर, ल्यूक राइट, ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सहा शतके आहेत.