ETV Bharat / sports

चहलने गुप्टीलला हासडली हिंदीतून शिवी, व्हिडिओ व्हायरल - ind vs nz t-20

भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने, न्यूझीलंडचा सलामीवर मार्टिन गुप्टीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, चहलने गुप्टीलला हिंदीतून शिवी हासडली. यावेळी चहलच्या शेजारी रोहित शर्माही उपस्थित होता. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Martin Guptill Uses Hindi Slang, Leaves Rohit Sharma in Splits
चहलने गुप्टीलला हासडली हिंदीतून शिवी, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Jan 27, 2020, 5:42 PM IST

Updated : Jan 27, 2020, 10:04 PM IST

ऑकलंड - भारतीय संघाने ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे २६ जानेवारीला दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ७ गड्यांनी धूळ चारली. भारतीय संघाने या विजयासह ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० ने आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यानंतर भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने, न्यूझीलंडचा सलामीवर मार्टिन गुप्टीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, चहलने गुप्टीलला हिंदीतून शिवी हासडली. यावेळी चहलच्या शेजारी रोहित शर्माही उपस्थित होता. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

घडलं असे की, सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हात मिळवले. त्यानंतर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि मार्टिन गुप्टिल चर्चा करत होते. त्यावेळी चहलने स्टार स्पोर्ट्सचा निवेदक जतिन सप्रूकडून माईक घेतला आणि तो गुप्टिलकडे गेला. यावेळी त्याने गुप्टिलने गमतीने थेट शिवी दिली.

हे पाहून तिथे उभा असलेल्या रोहितला हसू आवरता आले नाही. त्यावेळी लगेचच चहलने गुप्टिलला माईक सुरु असल्याचा आणि लाईव्ह प्रसारण सुरु असल्याची आठवण करुन दिली. यानंतर त्या दोघांच्यात लहान संभाषण झाले.

दरम्यान, भारतीय संघाने दुसऱया टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात लोकेश राहुलने नाबाद ५७ तर, मुंबईकर श्रेयस अय्यरने ४४ धावांची खेळी केली. राहुलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यूझीलंडच्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा ८ धावा काढून साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराटही ११ धावांवर माघारी परतला.

भारताने दोन महत्वाचे फलंदाज गमावल्यानंतर, राहुल आणि अय्यरने किल्ला लढवला. राहुलने आपला जादुई फॉर्म कायम राखत ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर, अय्यरने १ चौकार आणि ३ षटकार लगावले. भारत विजयाच्या जवळ येऊन पोहोचला असताना अय्यर बाद झाला. त्याला फिरकीपटू सोधीने बाद केले. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने नाबाद राहत राहुलसोबत विजय साकारला. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने सर्वाधिक दोन बळी घेतले.

हेही वाचा - 'तुझ्यासाठी मी पहाटे उठायचो', कोबीच्या जाण्याने विराट भावूक

हेही वाचा - IND Vs NZ २nd T-२०: भारताचा न्यूझीलंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.