ऑस्ट्रेलिया - क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत आपल्याला अनेक दिग्गज क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. जीव तोडून क्षेत्ररक्षण करताना या खेळाडूंसोबत अनेक अपघातही क्रिकेटच्या मैदानावर घडले आहेत. शिवाय, प्रेक्षकांमध्ये हशा पिकणाऱ्या गोष्टींची उदाहरणेही आपल्याकडे आहेत. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियातील मार्श चषक स्पर्धेत असाच एक प्रकार पाहायला मिळाला.
हेही वाचा - विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारतीय रिले संघ सातव्या स्थानी, अमेरिकेने जिंकले सुवर्ण
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनसोबत हा प्रकार घडला. मार्श चषक स्पर्धेत व्हिक्टोरिया संघाविरूद्ध क्वीन्सलँड संघ असा सामना रंगला होता. लाबुशेन हा क्वीन्सलँड संघाकडून खेळत होता. क्वीन्सलँडच्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिक्टोरिया संघाची वाईट अवस्था झाली होती. व्हिक्टोरिया संघाकडून विल सदरलँड आणि क्रिस ट्रेमेन हे दोघे फलंदाजी करत होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या दरम्यान सदरलँडने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाबूशेनने त्याच्या डाव्या बाजूला झेप घेऊन चेंडू अडवला आणि तो चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. फलंदाज धावबाद झाला. मात्र, क्षेत्ररक्षण करताना लाबूशेनची 'पँट' आली खाली. तरीही, त्याने कसलाही विचार न करता यष्टीरक्षकाकडे अफलातून थ्रो केला आणि आपली खेळाबद्दलची निष्ठा दाखवून दिली.
अॅशेस मालिकेमध्ये दुखापतग्रस्त स्टीव्ह स्मिथच्या जागी लाबुशेनला संघात स्थान देण्यात आले होते. लाबुशेनने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत दमदार प्रदर्शन केले होते. त्याने ऑस्ट्रेलियासाठी अॅशेसमध्ये ३५३ धावा केल्या होत्या.