मुंबई - भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. आज सायंकाळी ७:२९ पासून आपल्याला निवृत्त समजण्यात यावं असे धोनीने म्हटले आहे. धोनीने २०२१ च्या वर्ल्डकपच्या आधीच निवृत्ती घेतल्याने तो विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही याला पूर्णविराम मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या तुफानी खेळीने व विशेषत: हेलिकॉप्टर शॉटने क्रिकेट रसिकांच्या मनावर गारुड निर्माण केले होते.
- View this post on Instagram
Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired
">
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.
-
Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6
— ANI (@ANI) August 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6
— ANI (@ANI) August 15, 2020Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6
— ANI (@ANI) August 15, 2020
धोनीने आपल्या कारकीर्दीत भारतासाठी २००७ चा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक आणि कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला अव्वलस्थान मिळवून दिले होते. याच कालावधीत कर्णधार म्हणून धोनीने यशाचे शिखर गाठले होते. त्याच वेळी जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून धोनी नावारुपाला आहे. त्याने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले
धोनीची एकदिवसीय कारकीर्द-
- ३५० सामने
- १० हजार ७७३ धावा
- १० शतके व ७३ अर्धशतके
ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्द -
- ९८ ट्वेन्टी ट्वेन्टी सामने
- ३७.६० च्या सरासरीने १ हजार ६१७ धावा. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. यामुळेच त्याला मॅचफिनिशर ही उपाधी बहाल करण्यात आली.
धोनीची कसोटी कारकीर्द
- ९० कसोटी सामने
- ४ हजार ८७६ धावा
- ६ शतके, ३३ अर्धशतके
परीस स्पर्श असणाऱ्या धोनीचा फॉर्म 2019 सालच्या विश्वचषकात खालावला. त्याला एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला. या विश्वचषकात मॅचफिनिशर या उपाधीलाही गालबोट लागले. या विश्वचषकानंतर धोनी गेले सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. या काळात त्याच्या निवृत्तीबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. धोनी आपल्या अखेरचा विश्वचषक खेळणार की नाही याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा सल्ला दिला होता. तर काहींनी त्याची पाठराखण करत त्याला देशासाठी खेळत राहण्याची विनंती केली होती. आज अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत धोनीने आपल्य़ा निवृत्तीची घोषणा केली.