मुंबई - बीसीसीआयने नुकतीच क्रिकेट सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या तिघांची नावे जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्राची सुलक्षणा नाईक यांचे नाव आहे. नाईक यांच्या निवडीने महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. यांची निवड करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारताची माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांच्यासह माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल, वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.
निवड समिती सदस्यांची निवड असो किंवा भारताच्या प्रशिक्षकांची निवड या मोठ्या गोष्टींमध्ये क्रिकेट सल्लागार समितीची महत्वाची भूमिका असते. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.
-
🚨News Alert 🚨
— BCCI (@BCCI) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📰BCCI appoints 3-member Cricket Advisory Committee
Full Details here 👉👉 https://t.co/nMMbAUBtki pic.twitter.com/lnYSARUEXo
">🚨News Alert 🚨
— BCCI (@BCCI) January 31, 2020
📰BCCI appoints 3-member Cricket Advisory Committee
Full Details here 👉👉 https://t.co/nMMbAUBtki pic.twitter.com/lnYSARUEXo🚨News Alert 🚨
— BCCI (@BCCI) January 31, 2020
📰BCCI appoints 3-member Cricket Advisory Committee
Full Details here 👉👉 https://t.co/nMMbAUBtki pic.twitter.com/lnYSARUEXo
दरम्यान कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश असलेल्या निवड सल्लागार समितीने हित जोपसण्याचा आरोप झाल्यानंतर पदाचा त्याग केला होता. यामुळे नव्याने सल्लागार समिती निवडण्यात आली आहे.
क्रिकेट सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या मदनलाल यांनी भारतासाठी ३९ कसोटी आणि ६७ एकदिवसीय सामने खेळली आहेत. १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या विश्व करंडक संघाचे ते सदस्य आहेत. आरपी सिंह यांनी भारतासाठी १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळली आहेत.
आरपी सिंह भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात २००७ साली जिंकलेल्या टी-२० विश्व करंडक संघाचे सदस्य आहेत. तर सुलक्षणा नाईक यांनी भारतासाठी २ कसोटी ४६ एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामने खेळली आहेत.
हेही वाचा - खेळाडूंचा भन्नाट डान्स, पण टोपी घातलेला चौथा कोण? व्हिडिओ पाहा अन् ओळखा
हेही वाचा - शिखर-आयशाने पाहिला ऑस्ट्रेलियन ओपनचा सामना ...पाहा फोटो