मेलबर्न - जागतिक महिला दिनी रंगलेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताचा ८५ धावांनी धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन महिला संघाने पाचवे टी-२० विश्वविजेतेपद पटकावले. ऑसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीने नाबाद अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.
-
Women's #T20WorldCup winners:
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2009 - 🏴
2010 - 🇦🇺
2012 - 🇦🇺
2014 - 🇦🇺
2016 - 🌴
2018 - 🇦🇺
2020 - 🇦🇺
On another level. pic.twitter.com/CNQ5zvJCxG
">Women's #T20WorldCup winners:
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
2009 - 🏴
2010 - 🇦🇺
2012 - 🇦🇺
2014 - 🇦🇺
2016 - 🌴
2018 - 🇦🇺
2020 - 🇦🇺
On another level. pic.twitter.com/CNQ5zvJCxGWomen's #T20WorldCup winners:
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
2009 - 🏴
2010 - 🇦🇺
2012 - 🇦🇺
2014 - 🇦🇺
2016 - 🌴
2018 - 🇦🇺
2020 - 🇦🇺
On another level. pic.twitter.com/CNQ5zvJCxG
ऑस्ट्रेलियाचे १८५ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला डावाच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेली भारतीय सलामीवीर शफाली वर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाली. तिला मेगन स्कटने हिलीकरवी झेलबाद केले. शफाली बाद झाल्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली. तेव्हा जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात आली. तिला जेस जोनासेनने भोपळा फोडू दिला नाही. जेमिमाचा झेल निकोला कॅरीने घेतला.
स्मृती मानधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीवर भारताची आशा होती. पण स्मृती ११ धावांवर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत (४) जोनासेनचा शिकार ठरली. या दोघी बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ५.४ षटकात ४ बाद ३० अशी झाली. तेव्हा वेदा कृष्णमूर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी भारताचे अर्धशतक फलकावर लावले. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.
-
Champions 🤳#T20WorldCup pic.twitter.com/94dpsdR17R
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Champions 🤳#T20WorldCup pic.twitter.com/94dpsdR17R
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020Champions 🤳#T20WorldCup pic.twitter.com/94dpsdR17R
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने डावाच्या पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला. एलिसा हिलीने भारताच्या दीप्ती शर्माचे स्वागत चौकाराने केले. हिली आणि बेथ मूनी या जोडीने दीप्ती शर्माच्या पहिल्या षटकात १४ धावा चोपल्या. पण, या षटकाच्या पाचव्याच चेंडूवर शफाली वर्माने हिलीचा सोपा झेल सोडला. जीवदान मिळाल्यानंतर हिलीने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. तिने दीप्तीच्या दुसऱ्या षटकात ९ धावा फटकावल्या. चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिच्याच गोलंदाजीवर बेथ मूनीचा सोपा झेल सोडला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या ६ षटकात म्हणजे, पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४९ धावा केल्या. एका बाजूने हिली जोरदार फटकेबाजी करत होती. तर दुसऱ्या बाजू मूनीने पकडून ठेवली. हिलीने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. तिला राधा यादवने वेदाकडे झेल देण्यास भाग पाडलं. हिलीने हिलीने ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकाराच्या मदतीने ७५ धावा चोपल्या. हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली.
हिली बाद झाल्यानंतर दीप्ती शर्माने एका षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. कर्णधार मेन लॅनिंग १६ धावांवर शिखा पांडेकडे झेल देऊन बसली. तर एश्ले गार्डनरला (२) तानिया भाटियाने यष्टीचित केलं. त्यानंतर मूनीने खिंड लढवत अर्धशतक झळकावलं. शेवटी पूनम यादवने १९ व्या षटकात राचेल हायनेसला ( ४) बाद केले. यानंतर अखेर भारताला ऑस्ट्रेलियाला १८४ धावांवर रोखता आले. मूनी ७८ धावांवर नाबाद राहिली. भारताकडून दीप्तीने २ तर पूनम आणि राधा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.