ETV Bharat / sports

जोफ्रा आर्चर संघात असता तर इंग्लंडचा संघ अधिक मजबूत झाला असता - लिआम प्लंकेट

मूळचा विंडीजचा असलेल्या आर्चरला ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात इंग्लंडने १५ जणांच्या संघात स्थान दिले नाहीय.

जोफ्रा आर्चर
author img

By

Published : May 9, 2019, 8:07 PM IST

लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लिआम प्लंकेटला वाटते की, २४ वर्षांचा युवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंडच्या विश्वचषकाच्या संघात स्थान द्यायला हवे होते. आर्चर हा एक प्रतिभावान खेळाडू असून तो संघात असल्याने विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ अधिक मजबूत झाला असता. तो एक सर्वोत्ताम गोलंदाज असल्याचे त्याने सिद्ध केले असल्याचेही प्लंकेट म्हणाला.

मूळचा विंडीजचा असलेल्या आर्चरला ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात इंग्लंडने १५ जणांच्या संघात स्थान दिले नाहीय. आर्चरने इंग्लंडसाठी रविवारी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत २९ धावांमध्ये २ विकेट मिळवलेत, तर एका पाक फलंदाजाला धावबादही केले. या सामन्यात इंग्लंडने पाकवर सात गडी राखून विजय मिळवला.

जोफ्रा आर्चर
जोफ्रा आर्चर

प्लँकेटच्याआधी, इंग्लंडचा माजी दिग्गज ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफनेही आर्चर इंग्लंडचा विश्वचषक संघात हवा असल्याची भूमिका घेतली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.