नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात गुप्टीलने केलेल्या ओव्हर-थ्रो वर पंचानी 6 धावा बहाल केल्या. हा निर्णय देणारे श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेनाने आपला तो निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना हा कबुली दिली आहे.
विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना यजमान इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड या संघात झाला. हा सामना निर्धारीत 50-50 षटकात आणि सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत सुटला. त्यामुळे आयसीसीच्या चौकाराच्या नियमाने इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. दरम्यान या सामना ओव्हर-थ्रो वर पंचानी दिलेल्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरला.
नेमक काय आहे प्रकरण -
सामन्याच्या शेवटच्या 50 व्या षटकात इंग्लंडला विजयासाठी तीन चेंडूत 9 धावांची गरज होती. तेव्हा या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 2 धाव घेण्याचा प्रयत्नात असलेल्या बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी गुप्टीलने थ्रो केला. तो थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे पंचानी इंग्लंड एकूण 6 धावा दिल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.
सामन्यानंतर पंचाच्या त्या निर्णयावर जगभरातून टीका करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आयसीसी बेस्ट अंपायर पुरस्कार प्राप्त सायमन टॉफेल यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी तो निर्णय चूकीचा असल्याचे सांगितले.
यानंतर पंचाच्या या निर्णयावर आयसीसीने हात वर केले होते. पण, आता त्या ओव्हर थ्रोवर 6 धावा देणारे श्रीलंकेचे अंपायर कुमार धर्मसेना यांनी आपण चूक केल्याचे मान्य केली. नियमानुसार ज्यावेळी गुप्टिलने थ्रो करण्यासाठी बॉल उचलला त्यावेळी अदिल राशिद आणि स्टोक्स दुसरी धाव घेताना एकमेकांचा क्रॉस झाले नव्हते. त्यामुळे 6 च्या ऐवजी 5 धावाच द्यायला हव्या होत्या असे धर्मसेना म्हणाले.
मी सामना संपल्यानंतर टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर मला समजले की मी चूकीचा निर्णय घेतला. पण, त्यांनी आम्हाला टीव्ही रिप्लेची सुविधा मिळाली नसल्याने 'त्या' चुकीचा पश्चाताप झाला नाही असे धर्मसेना म्हणाले.