राजकोट - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवारी) राजकोट येथे दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दुखापतग्रस्त रिषभ पंतच्या जागी ११ सदस्यीय संघात केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, पंतची आणि १५ सदस्यीय संघातील 'रिप्लेसमेंट' म्हणून आंध्रप्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या कोना श्रीकर भरत ऊर्फ के.एस. भरतला संघात स्थान मिळाले आहे.
-
UPDATE - K S Bharat named back-up wicket-keeper for 2nd ODI.
— BCCI (@BCCI) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full details here - https://t.co/c9Pk84rkbM #TeamIndia pic.twitter.com/ulOi6aKnRg
">UPDATE - K S Bharat named back-up wicket-keeper for 2nd ODI.
— BCCI (@BCCI) January 17, 2020
Full details here - https://t.co/c9Pk84rkbM #TeamIndia pic.twitter.com/ulOi6aKnRgUPDATE - K S Bharat named back-up wicket-keeper for 2nd ODI.
— BCCI (@BCCI) January 17, 2020
Full details here - https://t.co/c9Pk84rkbM #TeamIndia pic.twitter.com/ulOi6aKnRg
हेही वाचा - INDvsAUS : नाणेफेक जिंकून कांगारूंचा गोलंदाजीचा निर्णय
भरतने ७४ प्रथम श्रेणी सामन्यात ४ हजार १४३ धावा केल्या असून त्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीमध्ये त्याच्या नावावर एका त्रिशतकाची देखील नोंद आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक ठोकणारा तो पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला होता.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंत ४४ व्या षटकात फलंदाजी करत असताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यानंतर उर्वरित सामन्यात त्याने यष्टीरक्षण केले नव्हते. पंतने या सामन्यात २ चौकार आणि एका षटकारासह २८ धावांची खेळी केली. त्याला कमिन्सने माघारी धाडले होते.