मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू क्रृणाल पांड्याला बडोदा संघाचे कर्णधारपद दिले गेले आहे. आगामी विजय हजारे चषक स्पर्धेसाठी क्रृणालवर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : दीपक पुनियाला रौप्य, दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून घेतली माघार
या स्पर्धेदरम्यान भारतीय संघ कोणताही टी-२० सामना खेळणार नसल्याने बडोदा संघाच्या कर्णधारपदासाठी क्रृणाल उपस्थित असणार आहे. मागील वर्षी रणजी स्पर्धेत त्याने बडोदा संघाचे नेतृत्व केले होते. विजय हजारे चषक ही स्पर्धा २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान खेळवली जाणार आहे.
क्रृणालला नेतृत्व दिले असले तरी हार्दिक पांड्याला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू असलेल्य कृणालने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले होते.
बडोदा संघ -
क्रुणाल पांड्या, केदार देवधर, ऋषि अरोठे, दीपक हुडा, लकमन मेरीवाला, मितेश पटेल, बाबाशाफी पठान, युसुफ पठाण, निनाद रठवा, विष्णु सोलंकी, सोयेब सोपारिया, स्वप्निल सिंग, अदित्य वाघमोडे.