दुबई - दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅट्ट्रीक ठरली आहे. विशेष म्हणजे, चेन्नईचा संघ गुणतालिकेत प्रथमच तळाशी आहे. या सामन्यात धोनीने ३६ चेंडूंत ४७ धावा करत विजयासाठी प्रयत्न केले, पण तो अपयशी ठरला. धोनीच्या कामगिरीवर अभिनेता कमाल आर. खान याने प्रतिक्रिया दिली.
कमाल आर. खानने चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवासाठी त्याने धोनीला जबाबदार धरले. ''भाई, केस काळे करुन कोणी तरुण होत नाही. दोन धावा काढतानाही तुला धाप लागत होती. असा त्रास वय वाढल्यानंतर सर्वांनाच होतो. पण म्हातारपणी असा अपमान करुन घेणे तुला योग्य वाटतंय का? आम्ही तुझे चाहते आहोत, तुझी अशी अवस्था पाहून आम्हाला खूप दु: ख होतंय. त्यामुळे कृपया आता तू निवृत्ती स्वीकार'', असा टोला कमाल आर. खानने धोनीला लगावला आहे.
-
Bhai @msdhoni बाल काले करने से कोई जवान नहीं बन जाता! 2 रन के लिए भागने पर आपकी साँस उखड़ जाती है, जो बुढ़ापे में सबके साथ होता है! लेकिन किसने कहा, कि बुढ़ापे में खेलकर बेइज़्ज़ती कराना ज़रूरी है! हम आपके फ़ैन रहे हैं, आपको ऐसे देखकर अच्छा नहीं लगता! इज़्ज़त के साथ सन्यास लेलो!
— KRK (@kamaalrkhan) October 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bhai @msdhoni बाल काले करने से कोई जवान नहीं बन जाता! 2 रन के लिए भागने पर आपकी साँस उखड़ जाती है, जो बुढ़ापे में सबके साथ होता है! लेकिन किसने कहा, कि बुढ़ापे में खेलकर बेइज़्ज़ती कराना ज़रूरी है! हम आपके फ़ैन रहे हैं, आपको ऐसे देखकर अच्छा नहीं लगता! इज़्ज़त के साथ सन्यास लेलो!
— KRK (@kamaalrkhan) October 2, 2020Bhai @msdhoni बाल काले करने से कोई जवान नहीं बन जाता! 2 रन के लिए भागने पर आपकी साँस उखड़ जाती है, जो बुढ़ापे में सबके साथ होता है! लेकिन किसने कहा, कि बुढ़ापे में खेलकर बेइज़्ज़ती कराना ज़रूरी है! हम आपके फ़ैन रहे हैं, आपको ऐसे देखकर अच्छा नहीं लगता! इज़्ज़त के साथ सन्यास लेलो!
— KRK (@kamaalrkhan) October 2, 2020
या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. युवा खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्या झुंजार खेळीमुळे सनराजझर्स हैदराबादने २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. तर, हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या २० षटकांत ५ गडी बाद १५७ धावा झाल्या.