ETV Bharat / sports

‘हा’ खेळाडू संघात असता तर कोलकाताने आणखी जेतेपदे जिंकली असती - गंभीर

author img

By

Published : Apr 18, 2020, 7:08 PM IST

गंभीर म्हणाला, “रसेल ५० लाखांच्या बोलीसह कोलकातामध्ये दाखल झाला आणि पवन नेगीला आठ कोटींची बोली लावून दिल्लीत घेतले गेले. माझ्या सात वर्षाच्या काळात रसेल कोलकाता संघात असता तर आम्ही दोन पेक्षा जास्त जेतेपदे पटकावली असती.”

Kolkata would have won more IPL titles if Russell were there said gautam gambhir
‘हा’ खेळाडू संघात असता तर कोलकाताने आणखी जेतेपदे जिंकली असती - गंभीर

नवी दिल्ली - फ्रेंचायझीने विंडीजच्या आंद्रे रसेलला आधी संघात घेतले असते तर कोलकाताने आणखी आयपीएल जेतेपदे जिंकली असती, असे मत भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने दिले आहे.

गंभीर म्हणाला, “रसेल ५० लाखांच्या बोलीसह कोलकातामध्ये दाखल झाला आणि पवन नेगीला आठ कोटींची बोली लावून दिल्लीत घेतले गेले. माझ्या सात वर्षाच्या काळात रसेल कोलकाता संघात असता तर आम्ही दोन पेक्षा जास्त जेतेपदे पटकावली असती.”

कोलकाता नाईट रायडर्सने दोनवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. ही जेतेपदे कोलकाताने गंभीरच्या नेतृत्वाखाली पटकावली आहेत. २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यानंतर २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला हरवत केकेआरने विजेतेपद पटकावले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.