कोलकाता - आयपीएलच्या बाराव्या मोसमातील 35 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरूशी भिडणार आहे. ईडन गार्डन्स मैदानावर आज रात्री 8 वाजता हा सामना रंगणार आहे.
आयपीएलचा दोन वेळा विजेता असलेल्या कोलकाताने 12 व्या मोसमामध्ये आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. तर तेवढ्याच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना कारावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरुन केकेआर सहाव्या स्थानी फेकला गेलाय. मागच्या 3 सामन्यांमध्ये त्याना संलग पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दुसरीकडे, बंगळुरूच्या संघांला आठ सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळवता आला असल्याने ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने आज सामना गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. प्लेऑफपर्यंत पोहचण्याची बंगळुरूला उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.
या सामन्यात केकेआरचे धडाकेबाज फलंदाज ख्रिस लीन आणि आंद्रे रसेल तर बंगळुरूचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, डेल स्टेन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स - दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिअप्पा, पृथ्वीराज, सुनील नरेन, पीयूष चावला.