अबुधाबी - मुंबई इंडियन्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव केला. यानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. तसेच त्याने मुंबई इंडियन्सचा गोलंदाजांचे कौतुकही केले.
सामना संपल्यानंतर मॉर्गन म्हणाला, आम्ही प्रथम फलंदाजी करताना काही चुका केल्या. पण, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. तसेच ते स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ कसे आहेत ते दाखवून दिले. आम्हाला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
स्पर्धा मध्यावर आली आली असून ही बदल करण्याची योग्य वेळ आहे. आम्हाला प्रतिस्पर्धी संघ पाहून फलंदाजीचा क्रम बदलावा लागणार आहे. आमचा फलंदाजीचा क्रम मजबूत आहे. पण यात काही बदल आवश्यक आहेत. परिस्थिती पाहून आम्हाला आमचा खेळ करावा लागणार आहे, असेही मॉर्गनने सांगितले.
दिनेश कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगत केकेआरच्या संघाचे कर्णधारपद मॉर्गनकडे सोपवले. यावर मॉर्गन म्हणाला, केकेआर संघात अनेक खेळाडू संघाचे नेतृत्व करू शकणारे आहेत. पण माझ्याकडे ही जबाबदारी सोपण्यात आली आहे. दिनेशने निस्वार्थीपणा दाखवत कर्णधारपद सोडले. यामुळे मी कर्णधारपद स्वीकारलं.
दरम्यान, कोलकाताने मुंबईला विजयासाठी १४९ धावांचे आव्हान दिले आहे. पॅट कमिन्सचे झुंजार अर्धशतक आणि कर्णधार इयान मॉर्गनच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे कोलकाताने मुंबईसमोर २० षटकांत ५ बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
हेही वाचा - दिनेश कार्तिकने सोडले कोलकाताचे कर्णधारपद
हेही वाचा - MI vs KKR : मुंबईचा कोलकातावर सहज विजय; डी-कॉकची शानदार खेळी