ETV Bharat / sports

आता बस्स झालं..! पराभवानंतर विराटला आली जाग, सुरू केली मोठ्या बदलाची तयारी - VIRAT KOHLI

न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जाग आली आहे. पराभवानंतर विराटने संघात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याने जलदगती गोलंदाजांचे वाढते वय विचारात घेता, भविष्यात नवी पिढी घडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Kohli indicates 'mini transition' of pace unit in near future
आता बस्स झालं..! पराभवानंतर विराटला आली जाग, सुरू केली मोठ्या बदलाची तयारी
author img

By

Published : Mar 3, 2020, 6:55 PM IST

Updated : Mar 3, 2020, 7:40 PM IST

मुंबई - न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जाग आली आहे. पराभवानंतर विराटने संघात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याने जलदगती गोलंदाजांचे वाढते वय विचारात घेता, भविष्यात नवी पिढी घडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

याविषयी विराट म्हणाला, 'जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांचे वय वाढत जाणार आहे. हे आता तरुण असणार नाहीत. त्यामुळे आम्हाला अशा खेळाडूंचा विचार करायला हवा जे सध्याच्या खेळाडूंची जागा घेऊ शकतील. जर एखाद्या सामन्यात दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले तर त्यावेळी पोकळी भरून काढणे भारतीय संघाला अवघड जाईल.'

भविष्याचा विचार करून जलदगती गोलंदाजांमध्ये नवदीप सैनीचा समावेश संघात केला जाईल. तसेच सैनी शिवाय आणखी दोन-तीन गोलंदाजांवर आमची नजर आहे, असेही विराट म्हणाला. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करणारा इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. पहिल्या कसोटीत त्याने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा पहिल्या सामन्यात १० तर दुसऱ्या सामन्यात ७ विकेटने पराभव झाला. या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

हेही वाचा - भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर, माजी कर्णधार संघात परतला

हेही वाचा - कोरोनाची दहशत : इंग्लंडचे खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवणार नाहीत

Last Updated : Mar 3, 2020, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.