किंग्स्टन - वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड बनवली आहे. भारतीय फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर विंडीजसमोर ४१६ धावांचा डोंगर उभा केला. त्यामध्ये हनुमा विहारीने शतक झळकावले असले तरी इशांत शर्माची चर्चा सर्वत्र झाली आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय स्विमींग चॅम्पियनशीप : महाराष्ट्राचा वीरधवल खाडे अंतिम फेरीत दाखल
इशांतने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने ८० चेंडूत ५७ धावांची खेळी केली. त्याने जेव्हा अर्धशतकाची धाव घेतली तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला. पण, विराटच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद दिसत होता. इशांतचे अर्धशतक होताच विराटने हात वर करून त्याचे अभिनंदन केले. सोबत त्याने टाळ्याही वाजवल्या.
-
Maiden Test Fifty for Ishant Sharma 👏#WIvIND pic.twitter.com/AhKmVBOUjp
— Anupam (@Anupam381) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maiden Test Fifty for Ishant Sharma 👏#WIvIND pic.twitter.com/AhKmVBOUjp
— Anupam (@Anupam381) August 31, 2019Maiden Test Fifty for Ishant Sharma 👏#WIvIND pic.twitter.com/AhKmVBOUjp
— Anupam (@Anupam381) August 31, 2019
-
Well played @ImIshant. The standing ovation from the Captain says it all. #WIvIND pic.twitter.com/dgHq8hgjuY
— Anupam (@Anupam381) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Well played @ImIshant. The standing ovation from the Captain says it all. #WIvIND pic.twitter.com/dgHq8hgjuY
— Anupam (@Anupam381) August 31, 2019Well played @ImIshant. The standing ovation from the Captain says it all. #WIvIND pic.twitter.com/dgHq8hgjuY
— Anupam (@Anupam381) August 31, 2019
दुसऱ्या दिवसअखेर विंडीजचा संघ ७ बाद ८७ धावा करुन फॉलोऑनच्या छायेत आहे. भारताने पहिल्या डावांत हनुमा विहारी १११, विराट कोहलीच्या ७६, इशांत शर्माच्या ५७ आणि मयंक अग्रवालच्या ५५ धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. विहारीने कसोटीमधील आपले पहिले शतक ठोकले.