ऑकलंड - इडन पार्क मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी करणाऱ्या राहुलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
T20I 50s in NZ (By Indians)
— CricBeat (@Cric_beat) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rahul - 2*
Iyer - 1
Raina - 1
Rohit - 1
Yuvraj - 1#NZvsIND
">T20I 50s in NZ (By Indians)
— CricBeat (@Cric_beat) January 26, 2020
Rahul - 2*
Iyer - 1
Raina - 1
Rohit - 1
Yuvraj - 1#NZvsINDT20I 50s in NZ (By Indians)
— CricBeat (@Cric_beat) January 26, 2020
Rahul - 2*
Iyer - 1
Raina - 1
Rohit - 1
Yuvraj - 1#NZvsIND
हेही वाचा - ..प्रश्न सुटला का?
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या यष्टिरक्षकांच्या यादीत राहुलने महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली आहे. यष्टिरक्षक म्हणून धोनी आणि लोकेश राहुलने प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली आहेत. न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल आता पहिल्या स्थानी आहे.
न्यूझीलंडच्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा ८ धावा काढून साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराटही ११ धावांवर माघारी परतला. भारताने दोन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर, राहुल आणि अय्यरने किल्ला लढवला. राहुलने आपला जादुई फॉर्म कायम राखत ३ चौकार आणि २ षटकार ठोकले.