ETV Bharat / sports

KXIP VS KKR : एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज, अन्... - nitish rana run out news

राहुल आजच्या सामन्यात १० चेंडूत ४ धावाच करू शकला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलने शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणाने चोरटी धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. पण, गिलचे त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरनने राणाला धावबाद करून माघारी पाठवले.

kkr vs kxip huge mix between shubman gill and nitish rana has led run out
KXIP VS KKR : एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज, अन...
author img

By

Published : Oct 10, 2020, 6:29 PM IST

आबुधाबी - आयपीएल 2020मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आबुधाबीमध्ये सामना खेळला जात आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे कोलकाताच्या संघाकडून सलामीला उतरले. मागील सामन्यात अर्धशतक झळकावणारा राहुल त्रिपाठीच्या दांड्या मोहम्मद शमीने गुल केल्या.

राहुल आजच्या सामन्यात १० चेंडूत ४ धावाच करू शकला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलने शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणाने चोरटी धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. पण, गिलचे त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरनने राणाला धावबाद करून माघारी पाठवले. लिंकवर क्लिककरून पाहा व्हिडीओ...

  • Comedy of errors: Rana walks back

    Big mix-up between Gill & Rana. Both caught in the crease at one end. Rana is run-out. KKR lose their second.

    📹📹https://t.co/RnUq5W3Wmg #Dream11IPL

    — IndianPremierLeague (@IPL) October 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोलकाताने कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुबमन गिल यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या दमदार भागिदारीच्या जोरावर केकेआरने पंजाबसमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत टिच्चून मारा केल्याने केकेआरच्या धावांवर लगाम लागला होता. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत धावसंख्या दीडशेपार नेली. दोघांनी अर्धशतके झळकावत केकेआरला १६४ धावांची मजल मारून दिली.

हेही वाचा - पाकिस्तानला मिळू शकतो 'हा' साडे सात फुटाचा गोलंदाज!

हेही वाचा - 'केदार म्हणजे हुंड्यात आलेल्या मेव्हण्यासारखा…', सेहवागने चेन्नईच्या फलंदाजांची घेतली शाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.