ETV Bharat / sports

दिग्गज खेळाडू केव्हिन पीटरसनकडे इंग्लंड संघाचे नेतृत्व

author img

By

Published : Feb 26, 2021, 3:39 PM IST

५ मार्च ते २१ मार्च यादरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड लेजेंड्सचा संघ शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीहून रायपूरला जाणार आहे. बांगलादेशचा संघ शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी ढाका येथून कोलकातामार्गे रायपूरला पोहोचेल. एजुकेशन टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म अनअॅकॅडमी ही लीगची शीर्षक प्रायोजक आहे, तर व्हायकॉम १८ हे प्रसारण भागीदार आहेत.

केव्हिन पीटरसन रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज
केव्हिन पीटरसन आणि विराट कोहली

मुंबई - छत्तीसगडच्या रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंग्लंड संघाची धुरा केव्हिन पीटरसकडे असणार आहे. तर, खालीद महमूद बांगलादेश लेजेंड्स संघाचे नेतृत्व करेल. मॅथ्यू हॉगार्ड, ओवेस शाह, माँटी पानेसार आणि निक क्रॉम्पटन हे इंग्लंड लेजेंड्स संघातील इतर महत्त्वाचे खेळाडू आहेत. बांगलादेश संघात नफीज इक्बाल, अब्दुर रझाक आणि मोहम्मद रफिक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

५ मार्च ते २१ मार्च यादरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड लेजेंड्सचा संघ शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीहून रायपूरला जाणार आहे. बांगलादेशचा संघ शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी ढाका येथून कोलकातामार्गे रायपूरला पोहोचेल. एजुकेशन टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म अनअॅकॅडमी ही लीगची शीर्षक प्रायोजक आहे, तर व्हायकॉम १८ हे प्रसारण भागीदार आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज गेल्या वर्षी सुरू झाली होती, परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेचे केवळ चार सामने खेळले गेले. आयोजकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सचिन तेंडुलकरसह वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, मुथय्या मुरलीधरन यांच्यासह आणखी अनेक माजी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. यात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि यजमान भारतातील अनेक माजी क्रिकेटपटू भाग घेतील. देशात रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे."

कोरोनाच्या प्रवासी निर्बंधामुळे ऑस्ट्रेलिया लेजेंड्स संघाने या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत बांगलादेश लेजेंड्सचा समावेश झाला आहे.

हेही वाचा - भारतात विराटचा धोनीला 'धोबीपछाड', वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.