लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत दुखापतीमुळे शिखर धवन स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर धवनच्या अनुपस्थितीत अष्टपैलू विजय शंकरची निवड करण्यात आली. मात्र, विजय शंकरला अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजाना चांगलेच सतावले. यामुळे शंकरला संघाबाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी होत आहे. मात्र, यावर इंग्लडचा माजी खेळाडू केवीन पीटरसन यानेही आपली प्रतिक्रिया नोंदवली.
सोशल मीडियावरुन विजय शंकरला संघाबाहेर करुन ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी सुरू होती. तेव्हा पीटरसन शंकरच्या मदतीला धावून आला आहे. त्याने विजय शंकरला संघातून काढू नये. अशी विनंती विराट कोहली आणि रवि शास्त्री यांना केली आहे. ऋषभला अंतिम संघात जागा मिळण्यासाठी अजून खुप वेळ आहे, तो अद्याप तयार झालेला नाही, असे पिटरसन म्हणाला.
विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अंजिक्य राहिला आहे. भारताने ६ सामने खेळले असून त्यामध्ये ५ सामन्यात विजय तर एक सामना पावसाअभावी होऊ शकलेला नाही. भारताचा पुढील सामना रविवारी यजमान इंग्लड संघाबरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वी पीटरसन याने ट्विट करत विजय शंकरला संघात कायम ठेवण्याची विनंती केली आहे.