तिरुअनंतरपुरम - लॉकडाऊनच्या काळात, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी, पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नागरिक ड्रोन पाहून कारवाईच्या भितीने पळत सुटल्याचे अनेक व्हिडिओ, सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात केरळ पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवरून ड्रोनने चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी क्रिकेटची कॉमेंट्री जोडली आहे.
-
Drone sightings during lockdown... pic.twitter.com/kN3a4YCJ5D
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Drone sightings during lockdown... pic.twitter.com/kN3a4YCJ5D
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 7, 2020Drone sightings during lockdown... pic.twitter.com/kN3a4YCJ5D
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 7, 2020
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. पण अजुनही काही लोकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्यांवर आता सरकारकडून कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जाणार आहेत. अशा लोकांवर ड्रोनची नजर ठेवण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
केरळ पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ड्रोनला पाहून नागरिक कारवाईच्या भितीने सैरभैर धावत आहेत. आपण पोलिसांना दिसू नये यासाठी अनेक नियम मोडणारे लोक आपला चेहरा लपवून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नीट पाहा त्यामध्ये हा ड्रोन कसा काम करणार आहे, हे पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्वाचे म्हणजे, केरळ पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिग्गज क्रिकेटर कपिल देव, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा यांच्या आवाजात कॉमेंट्री बॅकग्राऊंडला जोडली आहे. त्यामुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रवी शास्त्री यामध्ये 'ट्रेस ऑफ बुलेट' टर्म समजावून सांगत आहेत.
-
Drone sightings during lockdown... pic.twitter.com/kN3a4YCJ5D
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Drone sightings during lockdown... pic.twitter.com/kN3a4YCJ5D
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 7, 2020Drone sightings during lockdown... pic.twitter.com/kN3a4YCJ5D
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 7, 2020
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यत या व्हिडिओला १७ हजार १०० लोकांनी लाईक केले आहे. तर ६ हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा - VIDEO : अॅशेसमधील सर्वोत्कृष्ठ झेल, पाहा फक्त साडेतीन मिनिटात अन् तेही एका क्लिकवर...
हेही वाचा - मोदी सरकार ठरवेल, भारत-पाक सामना खेळायचा की नाही, दिग्गज खेळाडूनं शोएबला फटकारलं