नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. या अँजिओप्लास्टीनंतर त्यांनी आपली प्रकृती बरी असल्याचे सांगितले आहे. कपिल देव यांनी एक पोस्ट शेअर करत हा संदेश आपल्या चाहत्यांना दिला.
- — Kapil Dev (@therealkapildev) October 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Kapil Dev (@therealkapildev) October 23, 2020
">— Kapil Dev (@therealkapildev) October 23, 2020
कपिल देव यांनी शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) छातीत दुखण्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या वृत्तानंतर क्रीडाजगत आणि इतर क्षेत्रातील अनेकांनी आपल्या लाडक्या कर्णधाराच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. कपिल देव सध्या आयसीयूमध्ये असून ते डॉक्टर अतुल माथूर यांच्या पथकाच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना काही दिवसांत रुग्णालयामधून सोडण्यात येईल.
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक -
घरगुती क्रिकेटमध्ये गोलंदाजीची छाप पाडल्यानंतर कपिल देव यांनी १ ऑक्टोबर १९७८ला पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि याच महिन्याच्या १६ तारखेला पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या काही दिवसानंतर कपिल देव यांनी 'दादा' संघ अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. पहिल्या २५ सामन्यात १०० गडी आणि १००० धावा करणारे कपिल देव पहिलेच भारतीय खेळाडू ठरले. 'हरियाणा हरिकेन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वात १९८३च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पहिल्यांदा विजेतेपद मिळवून दिले.