ख्राईस्टचर्च - न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. विल्यमसनचे हे कसोटी क्रिकेटमधील सलग तिसरे शतक ठरले. त्याने २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात २५१ धावांची खेळी साकारली होती. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दोनही कसोटी सामन्यात शतक झळकावले.
पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाअखेर ३ बाद २८६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड दुसऱ्या दिवसखेर ११ धावांनी मागे आहे. टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी न्यूझीलंडला ५२ धावांची सलामी दिली. ब्लंडलचा (३३) अडथळा शाहीन शाह आफ्रिदीने दूर केला. यानंतर ब्लंडलची (१६) शिकार फहिम अशरफने केली. रॉस टेलर देखील अवघ्या १२ धावा काढून बाद झाला.
हेही वाचा - टीम इंडियाला दिलासा; वादानंतर संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह
न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ७१ अशी झाली होती. तेव्हा कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस या जोडीने डाव सावरला. दोघांनी नाबाद द्विशतकी भागिदारी केली. दोघांनी ३३७ चेंडूत नाबाद २१५ धावा जोडल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विल्यमसन ११२ तर निकोलस ८९ धावांवर नाबाद आहेत.
नो बॉल आणि निकोलसला मिळाले जीवनदान
निकोलस ३ धावांवर खेळत होता. तेव्हा शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर त्याचा झेल यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानने टिपला. पण हा चेंडू पंचांनी नो बॉल ठरला. यामुळे निकोलसला जीवनदान मिळाले. या संधीचा फायदा उचलत निकोलसने पाक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत नाबाद ८९ धावांची खेळी केली.
हेही वाचा - Ind Vs Aus : सिडनीतील कसोटी सामना फक्त २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणार