दुबई - आयसीसीने आज कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि भारताचा विराट कोहली या दोघांना धक्का देत न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने अव्वलस्थान पटकावले आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणे यानेही क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी होता. केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात १२९ धावांची खेळी केली. त्याला या खेळीचा फायदा झाला. तो स्मिथ आणि विराटला मागे टाकत कसोटी क्रमवारीत ८९० गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे. स्मिथला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयश आले. याचा फटका त्याला बसल्याचे पाहायला मिळत आहे. स्मिथच्या खात्यात ८७७ गुण आहेत. तर विराटच्या खात्यात ८७९ गुण आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो क्रमवारीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानी पोहोचला आहे.
गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विनने दोन, तर जसप्रीत बुमराहने एका स्थानाच्या सुधारणेसह अनुक्रमे ७ व ९वा क्रमांक पटकावला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी मालिकेनंतरही राहणार बायो बबलमध्ये, जाणून घ्या कारण
हेही वाचा - Ind vs Aus : टीम इंडियाला जबर धक्का, उमेश यादवची उर्वरित कसोटी मालिकेतून माघार