ETV Bharat / sports

INDvsAUS : लँगरची भारत दौऱ्यातून माघार, ऑस्ट्रेलिया 'या' प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात खेळणार - ऑस्ट्रेलिया अँण्ड्रयू मॅकडोनाल्डच्या मार्गदर्शनात खेळणार

लँगर यांच्या अनुपस्थितीत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता वरिष्ठ साहाय्यक अँण्ड्रयू मॅकडोनाल्ड यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, मॅकडोनाल्ड प्रथमच राष्ट्रीय संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे.

justin langer to take coaching  break while australia tour india
INDvsAUS : लँगरची भारत दौऱ्यातून माघार, ऑस्ट्रेलिया 'या' प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात खेळणार
author img

By

Published : Jan 7, 2020, 4:09 PM IST

सिडनी - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला १४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलिया संघाला एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी भारत दौऱ्यातून माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने जस्टीन लँगर यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. त्यापूर्वी त्यांनी घरच्याच मैदानावर पाकिस्तानला २-० धुळ चारली. घरच्या मैदानात वर्चस्व गाजवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र, या दौऱ्यातून ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी विश्रांती घेतली आहे.

justin langer to take coaching  break while australia tour india
जस्टीन लँगर सराव सत्रादरम्यान...

लँगर यांच्या अनुपस्थितीत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता वरिष्ठ साहाय्यक अँण्ड्रयू मॅकडोनाल्ड यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, मॅकडोनाल्ड प्रथमच राष्ट्रीय संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संघ -

  • अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -

  • १४ जानेवारी - मुंबई
  • १७ जानेवारी - राजकोट
  • १९ जानेवारी - बंगळुरू

हेही वाचा - INDvsSL : मालिकेत आघाडी कोणाची?...इंदूरचे मैदान दुसऱ्या टी-२० साठी सज्ज

हेही वाचा - शेन वॉर्न का विकतोय १४५ सामन्यात वापरलेली 'टेस्ट कॅप'?

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.