मुंबई - आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप याने आयपीएल माघार घेतली आहे. याची माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे दिली.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिप्लेसमेंट म्हणून जोश फिलिपच्या जागी बंगळुरूने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला याला संघात स्थान दिले आहे.
-
Finn Allen replaces Josh Philippe for #IPL2021.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We regret to inform that Josh Philippe has made himself unavailable for IPL 2021 due to personal reasons. As a result, we have picked an exciting top order batsman in Finn Allen.#PlayBold #Classof2021 pic.twitter.com/DaasJ58ngk
">Finn Allen replaces Josh Philippe for #IPL2021.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 10, 2021
We regret to inform that Josh Philippe has made himself unavailable for IPL 2021 due to personal reasons. As a result, we have picked an exciting top order batsman in Finn Allen.#PlayBold #Classof2021 pic.twitter.com/DaasJ58ngkFinn Allen replaces Josh Philippe for #IPL2021.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 10, 2021
We regret to inform that Josh Philippe has made himself unavailable for IPL 2021 due to personal reasons. As a result, we have picked an exciting top order batsman in Finn Allen.#PlayBold #Classof2021 pic.twitter.com/DaasJ58ngk
एलनला आयपीएल २०२१ साठी चेन्नईत झालेल्या मिनी लिलावात कुणीच खरेदी केलेले नव्हते. त्याची बेस प्राइस २० लाख होती. फिलिपच्या माघार नंतर घेतल्यानंतर बंगळुरूने ट्विट केले आहे. जोश फिलिपने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगताना आम्हाला दुःख होत आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आम्ही फिन एलन याला करारबद्ध केले आहे. असे बंगळुरूने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जोश फिलीपने युएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात बंगळुरूकडून पदार्पण केले होते. सलामीला येत त्याने ५ सामन्यात ७८ धावा केल्या होत्या. तर तेच फिन एलनने न्यूझीलंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने १२ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ अर्धशतक झळकावली आहेत. तसेच त्याने न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश टी-20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे.
हेही वाचा - भारतात होणाऱ्या टी-२० विश्व करंडकाचा 'हा' संघ असेल मुख्य दावेदार; इंग्लंडच्या खेळाडूची भविष्यवाणी
हेही वाचा - Video : क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे फलंदाजाला ठरवलं बाद; क्रिकेटप्रेमी म्हणतात वादग्रस्त निर्णय