मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्सने गंगा नदीत स्नान केले. याचा फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. ही पोस्ट सद्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरस होत आहे.
जॉन्टीने गंगा नदीच्या थंड पाण्यात अंघोळ केल्यानंतर 'भौतिक आणि आध्यात्मिक समाधान मिळाले. या नदीत अंघोळ केल्याने मोक्ष मिळतो', असं म्हटलं आहे.
-
Benefits of cold water immersion in the Holy Ganges are both physical and spiritual #moksha #rishikesh #internationalyogfestival pic.twitter.com/yKjJUZsoz2
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Benefits of cold water immersion in the Holy Ganges are both physical and spiritual #moksha #rishikesh #internationalyogfestival pic.twitter.com/yKjJUZsoz2
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) March 4, 2020Benefits of cold water immersion in the Holy Ganges are both physical and spiritual #moksha #rishikesh #internationalyogfestival pic.twitter.com/yKjJUZsoz2
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) March 4, 2020
उत्तराखंड पर्यटन विकास परिषद आणि गढवाल विकास मंचाकडून आंतरराष्ट्रीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जॉन्टीने मार्गदर्शन करताना, फिट राहण्याचे टिप्स दिले. शिबिराला हजारो नागरिकांना हजेरी लावली होती.
दरम्यान, आयपीएलच्या १३ हंगामाला २९ मार्चपासून सुरूवात होत आहे. या हंगामासाठी सर्वच संघानी आपल्या सराव सत्राला सुरुवात केली आहे. देशातील आणि परदेशातील खेळाडू याच सहभागी होत असून जॉन्टी रोड्स मुंबई इंडियन्ससाठी भारतात आला आहे.
हेही वाचा - IND VS ENG : शेफाली नव्हे 'ही' सर्वात धोकादायक, इंग्लंडच्या कर्णधाराची वाढू लागली भीती
हेही वाचा - Women's T२० WC : ..तर टीम इंडिया सामना न खेळताच अंतिम फेरीत, वाचा कारण