लंडन - इंग्लंडने श्रीलंका दौऱ्यासाठी आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बेन फोक्स आणि किटोन जेनिंग्स यांची एका वर्षांनी संघात वापसी झाली आहे. जॉनी बेअरस्टोव्हला संघातून वगळण्यात आले आहे.
सलामीवीर जेनिंग्स आणि यष्टीरक्षक फलंदाज फोक्स १ वर्षाआधी झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर संघात स्थान मिळवू शकले नव्हते.
जेम्स अँडरसन दुखापतीपतीमुळे उपलब्ध नाही. तर व्यक्तिगत कारणावरुन मोईन अलीने श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे.
दरम्यान, उभय संघातील २ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत असून या मालिकेला १९ मार्च पासून सुरूवात होणार आहे.
- असा आहे इंग्लंडचा संघ -
- ज्यो रूट (कर्णधार), डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्राँड, जोस बटलर, जॅक क्रॉले, सॅम कुरेन, ज्यो डेनली, बेन फोक्स, किटोन जेनिंग्स, जॅक लीच, मॅथ्यू पार्किनसन, ऑली पोप, डोमिनिक सिबले, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.