ETV Bharat / sports

जॉनी बेअरस्टोने गोलंदाजांना दिले चेन्नईविरुद्धच्या विजयाचे श्रेय - IPL

राशिद खानने ४ षटकांमध्ये १७ धावा देत गारद केले २ गडी

जॉनी बेअरस्टो
author img

By

Published : Apr 18, 2019, 2:15 PM IST

हैदराबाद - सनरायझर्स हैदराबादचा सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टोने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मिळालेल्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नईवर ६ गडी राखून विजय मिळवला.

सामना झाल्यानंतर बेअरस्टो म्हणाला की, आमचा संघ आयपीएलमधील एक सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्याच आमच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत अखेरच्या ११ षटकांमध्ये केवळ ६०-६५ धावा दिल्याने सामना आमच्याकडे वळला. या सामन्यात हैदराबादसाठी राशिद खानने ४ षटकांमध्ये १७ धावा देत सर्वाधिक २ गडी बाद केले.

वॉर्नर - बेअरस्टो
वॉर्नर - बेअरस्टो

चेन्नईविरुद्ध बुधवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेत निर्धारीत २० षटकांमध्ये फक्त १३२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने १६.५ षटकांमध्ये ४ गडी गमावत विजय मिळवला. हैदराबादसाठी सलामीवीर वॉर्नरने ५० तर बेअरस्टो ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.