मुंबई - भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी हार्दिक आणि मला खूप मदत केली असल्याचे अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्याने म्हटले आहे. हार्दिक आणि कृणाल इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. या संघाचे राईट यांनी प्रशिक्षकपद भूषवले होते.
क्रुणालने एका वृत्तसंस्थेला सांगितले, “ही भूतकाळातील गोष्ट आहे. स्पीड पोस्ट जॉबसाठी शासकीय भरती होती आणि मला ट्रायल्ससाठी एक पत्रही मिळाले. माझ्या वडिलांनी मला सांगितले, की तुला ही चांगली संधी आहे आणि तुला महिन्याला १५-२० लाख कमावता येतील. त्यामुळे तुला गेले पाहिजे. त्याच वेळी मला मुश्ताक अलीमध्ये बडोदा संघाकडून खेळण्यासाठी ट्रायल्सला जायचे होते. मला वाटले की गेली दोन-तीन वर्षे मी खूप मेहनत केली आहे आणि आता मला एक खेळाडू होण्याची संधी मिळाली आहे.”
क्रुणाल पुढे म्हणाला, “म्हणून मी स्पीड पोस्टच्या नोकरीवर गेलो नाही. मी क्रिकेटपटू होण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर मी ते पत्र फाडून टाकले आणि ट्रायल्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी ट्रायल्स दिली आणि चांगली कामगिरी केली. नंतर माझी बडोदा संघात निवड झाली. हार्दिक आधीपासूनच संघात होता. सय्यद मुश्ताक अलीचा सामना मुंबईत झाला. त्यानंतर, आम्ही दोघे भाऊ जॉन राइटच्या नजरेत आलो आणि त्यांनी आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी करताना पाहिले. त्यानंतर, त्यांचे आमच्याकडे लक्ष लागले आणि तिथून आमचे आयुष्य बदलले.
क्रुणाल म्हणाला, “मला वाटते की ते पत्र फाडून टाकणे माझ्यासाठी चांगले होते. जर मी ट्रायल्सला गेलो नसतो तर आज माझे आयुष्य वेगळे असते.”