लंडन - अॅशेसच्या पहिल्या कसोटीत कांगारुंनी विश्वविजेत्या इंग्लंडचा २५१ धावांनी पराभव केला. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा इंग्लंडचा संघ कसोटीमध्येही प्रबळ मानला जात होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला चांगलाच धक्का दिला आहे. आता आगामी होणाऱ्या अॅशेसच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला अजून एक धक्का लागला आहे.
कसोटीतील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून ओळख असलेला जेम्स अँडरसन दुखापतीमुळे अॅशेसच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. अँडरसनला पोटरीची दुखापत झाली आहे. त्यामुळे १४ ऑगस्टला होणाऱ्या लॉर्ड्स कसोटीपूर्वीच तो संघाबाहेर पडला आहे. या दुखापतीबाबच इंग्लंड क्रिकेटने माहिती दिली. पहिल्य़ा कसोटीत दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला होता.
-
BREAKING: James Anderson has been ruled out of the second #Ashes Test with a calf injury. pic.twitter.com/OvGaJwLfAS
— ICC (@ICC) August 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: James Anderson has been ruled out of the second #Ashes Test with a calf injury. pic.twitter.com/OvGaJwLfAS
— ICC (@ICC) August 6, 2019BREAKING: James Anderson has been ruled out of the second #Ashes Test with a calf injury. pic.twitter.com/OvGaJwLfAS
— ICC (@ICC) August 6, 2019
इंग्लंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, अँडरसनच्या दुखापतीवर डॉक्टरांचे मत घेण्यात येईल आणि त्यानंतरच त्याला मालिकेत खेळता येईल. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली आहे.