अँटिग्वा - विंडिजविरुद्ध टीम इंडिया आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने ३ बाद १८३ धावांची मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे विंडिजचा पहिला डाव २२२ धावांत आटोपला. यादरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फक्त एक बळी मिळवत मोठा विक्रम रचला आहे.
या सामन्यात खेळताना बुमराहने कसोटीतील बळींचे सर्वात जलद अर्धशतक साकारले आहे. सर्वात जलद ५० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने ११ व्या सामन्यातच ही कामगिरी करुन दाखवली. बुमराहनंतर वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी १३ सामन्यांत ही कामगिरी केली होती.
-
Quickest to reach 50 wickets ie in fewest Tests (by Indian pacers)
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
11 - Jasprit Bumrah
13 - Venkatesh Prasad/Mohd Shami
14 - Irfan Pathan/S Sreesanth
16 - Kapil Dev/Karsan Ghavri#IndvWI #WIvInd
">Quickest to reach 50 wickets ie in fewest Tests (by Indian pacers)
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 24, 2019
11 - Jasprit Bumrah
13 - Venkatesh Prasad/Mohd Shami
14 - Irfan Pathan/S Sreesanth
16 - Kapil Dev/Karsan Ghavri#IndvWI #WIvIndQuickest to reach 50 wickets ie in fewest Tests (by Indian pacers)
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 24, 2019
11 - Jasprit Bumrah
13 - Venkatesh Prasad/Mohd Shami
14 - Irfan Pathan/S Sreesanth
16 - Kapil Dev/Karsan Ghavri#IndvWI #WIvInd
विंडीजच्या पहिल्या डावात बुमराहने डॅरेन ब्राव्होला बाद केले होते. भारताच्या दुसऱ्या डावाला कर्णधार विराट आणि रहाणेने आकार दिला आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या १०४ धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने सामन्यावर आपली पकड बनवली आहे. खेळ संपेपर्यंत विराट कोहली १११ चेंडूत ५० धावा आणि रहाणे १४० चेंडूत ५३ धावांवर खेळत होता. २६० धावांची आघाडी घेतल्याने भारत सुस्थितीत आहे.
-
Good comeback from #TeamIndia with Rahane & Virat scoring 50s each. 185/3 at Stumps on Day 3 - Lead by 260 runs #WIvIND 👌🏻👏🏻👏🏻 pic.twitter.com/VguhBB1XEj
— BCCI (@BCCI) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Good comeback from #TeamIndia with Rahane & Virat scoring 50s each. 185/3 at Stumps on Day 3 - Lead by 260 runs #WIvIND 👌🏻👏🏻👏🏻 pic.twitter.com/VguhBB1XEj
— BCCI (@BCCI) August 24, 2019Good comeback from #TeamIndia with Rahane & Virat scoring 50s each. 185/3 at Stumps on Day 3 - Lead by 260 runs #WIvIND 👌🏻👏🏻👏🏻 pic.twitter.com/VguhBB1XEj
— BCCI (@BCCI) August 24, 2019