मुंबई - जसप्रीत बुमराह ज्यावेळी क्रिकेटमधून कारकीर्द संपवून निवृत्ती घेईल, त्यावेळी 'सुपरस्टार' असेल. बुमराहला क्रिकेटच्या सर्व प्रकारातील भारतातील महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाईल, यामध्ये कोणालाही शंका नसेल, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू जेसन गिलेस्पी याने बुमराहचे कौतुक केले आहे.
काय म्हणाला गिलेप्सी...
गिलेस्पी याने जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, भारताकडे यावेळी उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांची फळी आहे. सर्वांकडे गोलंदाजीमधील बलस्थाने आणि वेगवेगळी कौशल्यं आहेत. भारताला आपल्या वेगवान गोलंदाजीचा अभिमान असला पाहिजे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि ४ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. याती एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
भारताचा सुधारित संघ -
- टी-२० - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन
- एकदिवसीय संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
- कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा