मुंबई - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्राथला एक विक्रमामध्ये मागे टाकले आहे. अँडरसनने तब्बल ३० वेळा कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक गडी बाद केले आहेत. मॅग्राथने एका कसोटी डावात ५ किंवा त्याहून जास्त गडी २९ वेळा घेतले आहेत. त्याला मागे अँडरसनने मागे टाकले.
इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. यातील दुसऱ्या सामन्यात जेम्स अँडरसनने दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे ४० धावात ६ गडी बाद केले. एका डावात ३० व्यांदा ५ किंवा त्यापेक्षा जास्त गडी गारद करण्याची करामत त्याने करून दाखवली.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३८१ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेरीस २ बाद ९८ धावा केल्या असून आता त्यांचा संघ २८३ धावांनी पिछाडीवर आहे.
एका डावात सर्वाधिक पाच किंवा त्यापेक्षा जास्त गडी बाद करणारे गोलंदाज -
- मुथय्या मुरलीधरन - ६७ वेळा
- शेर्न वॉर्न - ३७ वेळा
- रिचर्ड हॅडली - ३६ वेळा
- अनिल कुंबळे - ३५ वेळा
- रंगना हेराथ - ३४ वेळा
- अँडरसन - ३० वेळा