मुंबई - क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) राष्ट्रीय संघात प्रवेशाची ऑफर दिली होती, असा खुलासा विस्फोटक फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्सने केला आहे. मात्र, त्याने अव्वल फॉर्ममध्ये असतानाच हा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. जगातील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या डिव्हिलियर्सने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण निवृत्तीनंतर पुन्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
डिव्हिलियर्स क्रिकेट कनेक्ट इव्हेंटमध्ये म्हणाला, की मी पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळू इच्छितो. माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला फॉर्मात असणे आवश्यक आहे आणि माझ्याबरोबर असलेल्या खेळाडूंपेक्षा मी उत्तम असले पाहिजे.
तो पुढे म्हणाला, “मी बर्याच दिवसांपासून संघाचा सदस्य नाही. मला वाटते की इतरांसाठी देखील मी इतका चांगला खेळ करून संघात स्थान मिळवू शकतो.”