ETV Bharat / sports

'सूर्या आणि इशान भारताच्या टी-२० विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यास हकदार' - VVS Laxman on Ishan Kishan

इशान आणि सूर्यकुमार यांनी पदार्पणाच्या सामन्यात जी खेळी केली. ती पाहता, ते भारताच्या टी-२० विश्वकरंडक संघात असतील. ही कठिण निवड आहे. पण दोघे विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यास हकदार आहेत, असे व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलं आहे.

Ishan, Suryakumar deserve to be part of India's T20 World Cup squad: Laxman
'सूर्या आणि इशान भारताच्या टी-२० विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यास हकदार'
author img

By

Published : Mar 25, 2021, 4:32 PM IST

मुंबई - इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांची भारतीय टी-२० संघात थाटात एन्ट्री झाली. इशानने पदार्पणाच्या सामन्यात ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी साकारली. तर सूर्यकुमारने ३१ चेंडूत ५७ धावांची वादळी खेळी केली. आता भारताच्या माजी दिग्गजाने, हे दोघे यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचे हकदार आहेत, असे म्हटलं आहे.

भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने आपले मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, की 'इशान आणि सूर्यकुमार यांनी पदार्पणाच्या सामन्यात जी खेळी केली. ती पाहता, ते भारताच्या टी-२० विश्वकरंडक संघात असतील. ही कठीण निवड आहे. पण दोघे विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवण्यास हकदार आहेत.'

दुसरीकडे भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितलं की, 'टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आणखी बराच कालावधी शिल्लक आहे आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून अनेक खेळाडू टीम इंडियात स्थान मिळवू शकतात.'

हेही वाचा - चांगला खेळाडू घडवायला दूरदृष्टी असणारा प्रशिक्षक लागतो, दुर्दैवाने प्रशिक्षकांची संख्या घटली

हेही वाचा - पुन्हा थरार.. भारत-पाक भिडणार, पाकिस्तान वृत्तपत्राचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.