मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामना भारत विरुध्द न्यूझीलंड संघात पार पडला. हा सामना पावसामुळे दोन दिवस खेळण्यात आला. या सामन्यात जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला न्यूझीलंडने धक्का देत १८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीबद्दल बरीच चर्चा झाली. धोनीविषयी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर केनने मजेशीर उत्तर दिले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केन विल्यमसनला 'तू जर भारताचा कर्णधार असता तर धोनीला ११ जणांच्या संघात खेळवलं असते का?' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नावर विल्यमसन म्हणाला, की 'धोनीने नागरिकत्व बदलले तर आम्ही त्याची निवड करु'.
-
Question: Would you have had Dhoni in your playing eleven?
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) July 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Kane Williamson: He's not eligible to play for New Zealand 😁#INDvNZ #CWC19 pic.twitter.com/jKQGp0s06a
">Question: Would you have had Dhoni in your playing eleven?
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) July 10, 2019
Kane Williamson: He's not eligible to play for New Zealand 😁#INDvNZ #CWC19 pic.twitter.com/jKQGp0s06aQuestion: Would you have had Dhoni in your playing eleven?
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) July 10, 2019
Kane Williamson: He's not eligible to play for New Zealand 😁#INDvNZ #CWC19 pic.twitter.com/jKQGp0s06a
'धोनी न्यूझीलंडसाठी खेळण्यास पात्र नाही. पण तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. मी जर भारताचा कर्णधार असतो तर त्याला संघात घेतले असते. धोनीचा अनुभव दांडगा आहे. तो परिस्थितीनुसार खेळी करतो. त्याने उपांत्य सामन्यात मोक्याच्या क्षणी चांगली खेळी केली. तो नागरिकत्व बदलणार आहे का? कारण आम्ही मग त्याच्या निवडीचा विचार करु' अशा शब्दात केन विल्यमसनने धोनीवर स्तुतीसुमने उधळली.