मुंबई - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भारतीय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा असून यात तो पठाणच्या लहान मुलाशी बॉक्सिंग करताना दिसून येत आहे. सद्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुंबईत रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळत आहेत. यात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या देशाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व असू या संघात इरफान पठाणदेखील आहे.
पहिला सामना भारतीय संघाने ७ गडी राखून जिंकला. यानंतर सचिन इरफान पठाणचा मुलगा इमरान पठाण यांच्याशी खेळताना दिसून आला. यादरम्यान, सचिन आणि इमरान यांच्यात बॉक्सिंगचा सामना रंगला होता. सचिन आणि इमरान यांच्यातील धमाल मस्ती इरफानने कॅमेऱ्यात कैद केली आणि तो व्हिडिओ त्याने शेअर केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेहवागने ५७ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७४ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
हेही वाचा - T२० World Cup Final : एलिसा हिलीने जे पुरुषाला जमलं नाही असा कारनामा केला
हेही वाचा - कोरोनाची धास्ती : आफ्रिकन खेळाडूंचा भारतीय दौऱ्यात हस्तांदोलन करण्यास नकार ?