मुंबई - जमावबंदीचे आदेश झुगारुन, सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांना, भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. व्हिडिओत तो, घरात नमाज पठण करण्याचे आवाहन करताना पाहायला मिळत आहे. इरफानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एखाद्या परिसरातील शांतता भंग होऊ नये, यासाठी चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे. पण, सामूहिक नमाज पठणाद्वारे या नियमाची पायमल्ली करण्यात येत आल्याचे प्रकार समोर आले. तेव्हा पोलिसांनी ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली. या दरम्यान, इरफानने व्हिडिओ संदेशाद्वारे सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांना संदेश दिला.
इरफान त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वत:चा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, 'यह मत सोचो कि मस्जिदों में जाने से मना किया गया है, बल्कि यह सोचो कि हर घर को मस्जिद में तब्दील करने को कहा गया है. हमारी तरह हमारे घर भी गुनहगार हो चुके हैं, आओ घरों को साफ करते हैं, कुछ देर घरों में ही नमाज पढ़ते हैं.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, इरफानच्या या व्हिडिओला नेटीझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने यावर कमेंट करताना, खूपच चांगले विचार सांगितलेस, असे म्हटले आहे. इरफानने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
हेही वाचा - वॉर्नने निवडली भारतीय खेळाडूची आयपीएल इलेव्हन, सचिनचा नाही समावेश
हेही वाचा - कोरोना लढ्यासाठी बटलरच्या जर्सीचा लिलाव; मिळाली 'इतक्या' लाखांची बोली