डब्लिन - इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावच ४५ षटकांमध्ये १९८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी केलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर विजय मिळवला. इंग्लंडकडून लिएम प्लंकेटने सर्वाधिक ४, तर टॉम कुरनने ३ विकेट घेतलेत
आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले. मात्र सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीस आलेल्या आणि आपला पहिलाचा वनडे सामना खेळणाऱ्या बेन फोक्सने झुंजार ६१ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तर आठव्या क्रमांकावर आलेल्या टॉम कुरनने ५६ चेंडूत ४७ धावा करत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
या सामन्यात इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चर, डेव्हिड मिलान आणि बेन फोक्स या ३ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.