मुंबई - श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली. उद्या (ता. १०) त्यांचा सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सशी होईल. आयपीएलचा पहिला अंतिम सामना खेळण्यासाठी दिल्लीला सर्वाधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. १३ व्या हंगामात या संघाला प्रथमच अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलची सुरूवात २००८ पासून झाली. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होतात. पण २०१० च्या हंगामात १० संघाचा समावेश होता. याशिवाय २०१२ आणि २०१३ च्या हंगामात प्रत्येकी ९ संघ सहभागी झाले होते. तेराव्या हंगामात ८ संघ आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सहा संघांना जेतेपद पटकावता आले आहे. वाचा कोणते आहेत ते संघ...
आयपीएल विजेते संघ
- २००८ साली राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. या हंगामात शेन वॉटसन मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २००९ डेक्कन चार्जर्स हैदराबादने पहिल्यादा स्पर्धा जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा पराभव केला. या हंगामात अॅडम गिलक्रिस्ट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१० साली चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यादा आयपीएल स्पर्धा जिंकली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या हंगामात सचिन तेंडुलकर मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०११ चेन्नई दुसऱ्यादा विजेता ठरला. त्यांनी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा पराभव केला. ख्रिस गेल मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१२ कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्यादा जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यता चेन्नईचा पराभव केला. सुनिल नरेन मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१३ मुंबई इंडियन्सने पहिल्यादा स्पर्धा जिंकली. त्यांनी चेन्नईचा पराभव केला. शेन वॉटसन मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१४ कोलकाताने दुसऱ्यादा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. ग्लेन मॅक्सवेल मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१५ मुंबईने दुसऱ्यादा जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नईला धूळ चारली. आंद्रे रसेल मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१६ सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यादा विजेती ठरली. त्यांनी अंतिम सामन्यात विराटच्या बंगळुरूचा पराभव केला. विराट कोहली मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१७ मुंबईने तिसऱ्यादा जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा पराभव केला. बेन स्टोक्स मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१८ चेन्नई तिसऱ्यादा विजेती ठरली. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. सुनिल नरेन दुसऱ्यादा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
- २०१९ मुंबई चौथ्यांदा विजेती ठरली. त्यांनी चेन्नईचा शेवटच्या चेंडूवर १ धावेने पराभव केला.
हेही वाचा - IPL २०२० : अंतिम सामन्याआधी सचिनचा मुंबई इंडियन्ससाठी खास संदेश
हेही वाचा - ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच भारतीय संघाला झटका; 'या' खेळाडूला झाली दुखापत