ETV Bharat / sports

क्रेझ आयपीएलची.. पाहुणे, नातेवाईक लग्नाला दांडी मारतील म्हणून यजमानांनी मंडपातच लावली भव्य स्क्रीन

अंतिम चेंडूवर दोन धावा काढण्यास चेन्नईचा संघ अपयशी ठरला आणि १ धावेने मुंबईने थरारक विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले.

author img

By

Published : May 13, 2019, 5:34 PM IST

क्रेझ आयपीएलची

ठाणे - आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईमधील अंतिम सामना पाहण्यासाठी चक्क एका विवाह सोहळ्यात नवरा–नवरीच्या व्यासपीठाच्या बाजूलाच भव्य स्क्रीन उभारून रौनक आणली होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारल्याने वऱ्हाडी मंडळींने एकच जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या लग्न सोहळ्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये चांगलीच रंगली आहे.

पाहुणे लग्नाला दांडी मारतील म्हणून यजमानांनी मंडपातच लावली भव्य स्क्रीन

आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जिल्ह्यातील मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे हाऊसफुल्ल झाल्याचे सर्वत्र दिसून आले. या सामन्याच्या निमित्ताने ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हॉटेल्समालकांनी मोठ्या स्क्रीन उभारून विविध सवलतीही जाहीर केल्या होत्या. तसेच काही ठिकाणी सोसायटीत भव्य पडदा उभारून सामन्याचा आनंद क्रिकेटप्रेमी घेत असतानाच लग्न सोहळ्यात पाहुणे मंडळी सामना पाहण्यासाठी दांडी मारतील या उद्देशाने यजमानांनी नवरा-नवरीच्या व्यासपीठाच्या बाजूला भव्य पडदा उभारून वऱ्हाडी मंडळींना सामना पाहण्यासाठी सोय केली होती.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज दीपक चाहर, शार्दुल ठाकूर व इम्रान ताहिर यांनी अचूक व शिस्तबद्ध मारा करत मुंबई इंडियन्सला विजेतेपदाच्या सामन्यात ८ बाद १४९ धावांपर्यंत रोखले. तर मुंबई इंडियन्सने उभारलेले आव्हान स्वीकारताना चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर शेन वॉटसनने अर्धशतक झळकावत विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र, शेन वॉटसन बाद होताच सामन्याचा निकाल मुंबई इंडियन्सच्या बाजूने फिरला. अंतिम चेंडूवर दोन धावा काढण्यास चेन्नईचा संघ अपयशी ठरला आणि १ धावेने मुंबईने थरारक विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले.

मुंबई इंडियन्सच्या थरार खेळाचा जल्लोष विवाह सोहळ्यात; व्हिडीओ व्हायरल

ठाणे :-मुंबई आणि चेन्नईमधील आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना विवाह सोहळ्यात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना पाहण्यासाठी एका यजमानांनी चक्क नवरा – नवरीच्या व्यासपीठाच्या बाजूला भव्य पडदा उभारून विवाह सोहळ्यात रौनक आणली होती. त्यातच अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारल्याने वऱ्हाडी मंडळींने एकच जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या विवाह सोहळ्याची चर्चा नेटकऱ्यामध्ये चांगलीच रंगली आहे.

मुंबई आणि चेन्नईमधील आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामन्यासाठी जिल्ह्यातील मोठमोठी हॉटेल,  रेस्टॉरंट, ढाबे हाऊसफुल्ल झाल्याचे सर्वत्र दिसून आले. या सामन्याच्या निमित्ताने ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंट मालकांनी मोठ्या स्क्रीन उभारून विविध सवलतीही जाहीर केल्या होत्या. तसेच काही ठिकाणी सोसायटीत भव्य पडदा उभारून सामन्याचा आनंद क्रिकेटप्रेमी घेत असतानाच लग्न सोहळ्यात पाहुणे मंडळी सामना पाहण्यासाठी दांडी मारतील बहुदा या उद्देशाने यजमानांनी नवरा – नवरीच्या व्यासपीठाच्या बाजूला भव्य पडदा उभारून विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींना सामना पाहण्यासाठी सोय केली होती.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज दीपक चाहर, शार्दुल ठाकूर व इम्रान ताहिर यांनी अचूक व शिस्तबद्ध मारा करत मुंबई इंडियन्सला विजेतेपदाच्या सामन्यात ८ बाद १४९ धावांपर्यंत रोखले. तर मुंबई इंडियन्सने उभारलेले आव्हान स्वीकारताना चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर शेन वॉटसनने अर्धशतक झळकावत विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र, शेन वॉटसन बाद होताच सामन्याचा निकाल मुंबई इंडियन्सच्या बाजूने फिरला. अंतिम चेंडूवर दोन धावा काढण्यास चेन्नई सुपर किंग्ज अपयशी ठरले आणि १ धावाच्या फरकाने मुंबई इंडियन्सने थरारक विजय मिळवत विजेतेपद पटकावले.  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.