ETV Bharat / sports

IPL २०२१ : बोट तुटल्यामुळे बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का - Ben Stokes

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

IPL 2021 : Rajasthan Royals Confirm Ben Stokes Ruled Out of IPL 2021 Due to Broken Finger
IPL २०२१ : बोट तुटल्यामुळे बेन स्टोक्स आयपीएल २०२१ बाहेर, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का
author img

By

Published : Apr 14, 2021, 12:22 PM IST

Updated : Apr 14, 2021, 12:42 PM IST

मुंबई - राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

बेन स्टोक्सला कशी झाली दुखापत -

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सोमवारी सामना पार पडला. या सामन्यातील पंजाबच्या डावातील १० व्या षटकात ख्रिस गेलचा झेल बेन स्टोक्सने सूर मारत टिपला. या दरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. त्याचे बोट तुटल्याची माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे. यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. पण तो आयपीएलच्या फायनलपर्यंत संघासोबतच राहणार आहे.

राजस्थान रॉयल्सने काय म्हटलं -

राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्सच्या दुखापतीविषयी ट्विट करत माहिती दिली. बेन स्टोक्सचे बोट मोडल्यामुळे दुर्दैवाने त्याला आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे. मात्र स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघासोबत ऑफ फील्ड राहून मदत करेल, असे राजस्थानने म्हटलं आहे.

दरम्यान, बेन स्टोक्सच्या दुखापतीमुळे राजस्थान संघाचे धाबे दणाणले आहे. याचे कारण म्हणजे आधीच जोफ्रा आर्चर जायबंदी आहे. तो सुरुवातीचे काही सामने खेळू न शकण्याची चिन्हे आहेत.

राजस्थानचा निसटता पराभव -

आयपीएलच्या १४व्या हंगामातील चौथा सामना सोमवारी रात्री राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर २२१ धावांचा डोंगर उभा केला होता. तेव्हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने झंझावती शतक ठोकत सामना राजस्थानकडे फिरवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना संजूला षटकार ठोकता आला नाही, तो सीमारेषेवर झेलबाद झाला आणि राजस्थानने सामना गमावला.

हेही वाचा - ज्वाला गुट्टाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अभिनेता विशालसोबत बांधणार लग्नगाठ

हेही वाचा - IPL २०२१ : 'सामना गमावला तरी मनं जिंकलीस, असाच खेळत राहा', आजी-माजी क्रिकेटपटूंकडून सॅमसनचे कौतुक

Last Updated : Apr 14, 2021, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.