ETV Bharat / sports

IPL २०२१ : इयॉन मॉर्गनचा आनंद गगनात मावेना, हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला...

विजयामुळे मी आनंदी आहे. आमच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी खासकरून नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी दमदार फलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगले प्रदर्शन केले. याहून चांगल्या सुरूवातीची आपेक्षा करूच शकत नाही, असे इयॉन मॉर्गनने म्हटलं आहे.

ipl 2021 kkr captain eoin morgan delighted with superb performance of youngsters
IPL २०२१ : इयॉन मॉर्गनचा आनंद गगनात मावेना, हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला...
author img

By

Published : Apr 12, 2021, 12:46 PM IST

चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने विजयारंभ केला. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाताने सनरायजर्स हैदराबादचा १० धावांनी पराभव केला. विजयानंतर कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने, आपल्या संघातील पहिल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाज यांचे कौतूक केले.

सामना संपल्यानंतर इयॉन मॉर्गन म्हणाला, 'विजयामुळे मी आनंदी आहे. आमच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी खासकरून नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी दमदार फलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगले प्रदर्शन केले. याहून चांगल्या सुरूवातीची आपेक्षा करूच शकत नाही. हैदराबादच्या संघाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक होतं. आम्ही आमच्या कामगिरीवर खूश आहोत.'

दरम्यान, कोलकाताने नितीश राणा (८०), राहुल त्रिपाठी (५३) आणि दिनेश कार्तिकच्या झटपट २२ धावा याच्या जोरावर १८८ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ २० षटकात ५ बाद १७७ धावा करू शकला. जॉनी बेयरस्टोने ५५ तर मनिष पांडेने नाबाद ६१ धावा करत कडवी झुंज दिली. पण तो देखील संघाचा पराभव टाळू शकला नाही.

हेही वाचा - RR vs PBKS : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज कडवी झुंज

हेही वाचा - KKR Vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सची विजयी सुरुवात; सनरायजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.