मुंबई - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची आयपीएल २०२१ मधील सुरूवात खराब झाली. चेन्नईला आपल्या सलीमीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाची चव चाखावी लागली. चेन्नईच्या खेळाडूंनी पराभव विसरत स्वत: तयारी केलेल्या बिर्याणीचा आस्वाद घेतला.
चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हे शेफच्या वेशात दिसत आहेत. त्यांनी बिर्याणी बनवण्यासाठी खास मेहनत घेतली. यात मसाले तयार करण्यापासूनची सर्व कामे खेळाडूंनी केली.
व्हिडिओ पाहिल्यास रैनाला स्वयपाक करण्याची गोडी असल्याचे दिसते. तर बिर्याणी तयारी झाली आहे की नाही याची तपासणी तसेच चव पाहण्याचे काम अंबाती रायुडू करताना पाहायला मिळत आहे. या दोघांशिवाय संघातील अनेक खेळाडू किचनमध्ये पाहायला मिळाले. ते दुसरी डिश तयार करत होते.
-
Food, fun and friends!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
EP 4️⃣ - Anbuden Diaries serves all of the pride's tasty feasts that were cooked with a sprinkle of #Yellove #WhistlePodu 🦁💛 @SPFleming7 @quality_nz pic.twitter.com/gLBzlThTO1
">Food, fun and friends!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2021
EP 4️⃣ - Anbuden Diaries serves all of the pride's tasty feasts that were cooked with a sprinkle of #Yellove #WhistlePodu 🦁💛 @SPFleming7 @quality_nz pic.twitter.com/gLBzlThTO1Food, fun and friends!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 12, 2021
EP 4️⃣ - Anbuden Diaries serves all of the pride's tasty feasts that were cooked with a sprinkle of #Yellove #WhistlePodu 🦁💛 @SPFleming7 @quality_nz pic.twitter.com/gLBzlThTO1
अखेरीस रैना आणि अंबाती यांचे कष्ट मार्गी लागले आणि बिर्याणी तयार झाली. या दोघांनी तयार केलेल्या बिर्याणीचा आस्वाद संघातील खेळाडूंनी एकत्र बसून घेतला. दरम्यान, चेन्नईचा दुसरा सामना १६ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : रोहितला धावबाद करणाऱ्या लीनचा पत्ता कट; जहीरने केली मोठी घोषणा
हेही वाचा - IPL २०२१ : असा पराक्रम फक्त ख्रिस गेलच करू शकतो, 'या' विक्रमापासून रोहित, विराटसह मातब्बर कोसो दूर