मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज दिल्ली विरुद्ध चेन्नई संघात सामना रंगणार आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर गेल्याने दिल्ली कॅपिटल्सची धुरा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे देण्यात आली. तर दुसरीकडे गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी केलेला महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदा नव्या दमासह मैदानावर उतरणार आहे. त्यात धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने तो चेन्नईविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, एनरिच नॉर्ट्जे क्वारंटाईन नियमामुळे पहिल्या सामना खेळू शकणार नाहीत. यामुळे या तिघांची कमतरता दिल्लीला पहिल्या सामन्यात मारक ठरू शकते. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा लुंगी निगिडीच्या बाबतीतही तीच समस्या आहे. तोही क्वारंटाइन असल्याने पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
हेड टू हेड आकडेवारी -
चेन्नई विरुद्ध दिल्लीची आतापर्यंतची आकडेवारी पाहता चेन्नई सुपर किंग्जचा संघ सरस आहे. आतापर्यंत चेन्नईने दिल्लीविरुद्ध १५ सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने चेन्नईचा ८ वेळा पराभव केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, आर अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्ट्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टिव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णु विनोद, लुकमान मेरिवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरेन आणि सॅम बिलिंग्स.
चेन्नई सुपर किंग्ज संघ -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसी, इमरान ताहीर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिशेल सेंटनेर, रविंद्र जडेजा, रूतुराज गायकवाड़, शार्दुल ठाकुर, सॅम कुरेन, आर साइ किशोर, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भागनाथ वर्मा आणि सी हरि निशांत.
हेही वाचा - श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया, वापसीबाबत दिली 'ही' माहिती
हेही वाचा - IPL २०२१ : मैदानात उतरून जीव तोडून खेळ करा; विराटने संघातील खेळाडूंचा वाढवला उत्साह