ETV Bharat / sports

ठरलं तर..! आयपीएलच्या नव्या पर्वासाठी 'या' तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव - bcci on ipl 2021

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ''आगामी आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. स्पर्धेच्या जागेबाबत निर्णय घेणे अद्याप बाकी आहे.''

IPL 2021 auction likely on February 18: BCCI official

author img

By

Published : Jan 22, 2021, 7:26 PM IST

नवी दिल्ली - आगामी आयपीएल स्पर्धा भारतात होणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने जोर दिला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ''आगामी आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. स्पर्धेच्या जागेबाबत निर्णय घेणे अद्याप बाकी आहे.'' कोरोना विषाणूच्या साथीमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात आला. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी मालिका यशस्वीपणे आयोजित केली गेली तर, आयपीएल स्पर्धा भारतात होण्याचा मार्ग मोकळा होईल.

२० जानेवारी ही खेळाडूंना रिटेन ठेवण्याची शेवटची तारीख होती. तर, ४ फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो (एका संघातून दुसर्‍या संघात खेळाडूंचे हस्तांतरण) सुरू राहणार आहे. आयपीएल संघांकडून रिलिज झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा - बीसीसीआयने आणली नवीन फिटनेस 'टेस्ट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.